मराठवाडा

जालना: ट्रेलरच्या धडकेत नवविवाहिता ठार; पती, दीर जखमी

अविनाश सुतार

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: भरधाव येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने पत्नी ठार, तर पती व मावस दीर जखमी झाले. ही घटना धुळे-सोलापूर महामार्गांवरील वडीगोद्री टी पाँईटवरील उड्डाणपूलाजवळ आज (दि. 2) दुपारी 12 च्या दरम्यान घडली. या अपघातात आश्विनी अनिकेत कादगे (वय 22 रा. रुई धानोरा, ता. गेवराई) ही नवविवाहित महिला जागीच ठार झाली. तर अनिकेत हनुमंत कादगे (वय 28 रा. रुई धानोरा, ता. गेवराई) व प्रमोद नामदेव घाटे (वय 22) हे जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, देऊळगावराजा येथील गुरूवारी लग्न आवरून आज (दि 2) सकाळी दुचाकी (एम एच 23 बी जी 6521) वरून पती पत्नी व मावस दीर रुई धानोरा येथे जात होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर कडून बीडकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने (जी जे 36 एक्स 3333) अंबड तालुक्यातील वडीगोद्री टी पाँईंटजवळ दुचाकीला धडक दिली. या धडकेत पत्नी ठार झाली. तर पती व मावस दीर दोघे जखमी झाले. या अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी वडीगोद्री येथील गावाकऱ्यांनी धाव घेत मदतकार्याला सुरूवात केली.

महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. गोंदी पोलिसांनी ट्रक ट्रेलर ताब्यात घेऊन शहागड चौकी येथे नेण्यात आला. तर ट्रक ट्रेलर चालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
आश्विनीचे साडे पाच महिन्यापूर्वी लग्न झाले होते. नवविवाहीत महिलेचा असे दुर्दैवी निधन झाल्याने रुई धानोरा येथील कादगे कुटुंबावर व नातेवाईकांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT