मराठवाडा

जालना : दुचाकींच्या अपघातात दोन तरुण जागीच ठार

backup backup

परतूर,  पुढारी वृत्तसेवा : परतूर सेलु मापेगाव पाटीजवळ दुचाकींचा समोरासमोर अपघात झाल्याने दोन युवक ठार झाल्याची घटना  घडली. कृष्णा विष्णू लहाने (वय २४ वर्ष रा. सुरुमगाव) आणि  शिवम मुंजाभाऊ झोटिंग (वय १८ वर्ष रा. चिंचोली) असे अपघात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

कृष्णा लहाने हा परतूरहून सेलु तालुक्यातील रवळगावला बहीणीकडे जात असताना मापेगाव पाटीजवळ समोरासमोर दोन्ही दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही दुचाकीवरील कृष्णा लहाने व  शिवम झोटिंग जखमी झाले होते. दोन्ही जखमींना परतूर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कृष्णा लहाने यांच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी परतूर येथे घोषित केले. तर शिवम झोटिंग याचा जालन्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कृष्णा लहाने याच्या मृतदेहावर परतूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टवार, पोलीस नाईक रामदास फूपाटे यांनी केला आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT