मराठवाडा

भोकरदन : लांडग्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या व एक वासरू ठार

backup backup

वालसावंगी : पुढारी वृत्तसेवा : शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या तीन शेळ्या व एक वासरू लांडग्याच्या हल्ल्यात ठार झाल्या. ही घटना आज गुरूवारी सकाळी सकाळी घडली. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील शेतकरी किशोर लक्ष्मण धायडे यांच्या शेतात लांडग्याने हल्ला केला. यात शेतकऱ्याचे अंदाजे ४०,००० रू नुकसान झाले. या अगोदरही शेतकऱ्यांना या परीसरात दोन तीन लांडगे दिसले होते. शेताला लागुनच पद्मावती धरण आसल्याने पाणी पिण्यासाठी लांडगे येत असल्याचे परीसरातील शेतकरी सांगतात. (Jalna)

शेतकरी आज सकाळी ४ वाजता चारा पाणी करून घरी आला होता. नंतर शेतात गेले आसता हा सगळा प्रकार दिसला. वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला वनकर्मचारी शिनगारे यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. हल्ल्यात ठार झालेल्या तिन्हीही शेळ्याच होत्या. त्यातलीच एक बकरी चार पाच दिवसातच व्यायलेल्या अवस्थेत दिसणार होती. अशा घटना या भागात वांरवांर होतात या भागात धरण असल्याने हिस्ञ जनावरे पाणी पिण्यासाठी या भागात येतात. तरी शेतकऱ्यांना शासनाकडुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गजानन सपकाळ,लक्ष्मण मळेकर,अंजिक्य वाघ,शंकर जाधव,विनोद वाघ याच्या कडुन होत आहे. (Jalna)

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT