मराठवाडा

जालना : गोंदी येथून अवैध वाळू साठा जप्त: ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

backup backup

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईट आणि पाथरवाला बुद्रुक येथे १०० ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई महसूल आणि पोलिसांच्या पथकाने आज (दि. 8) दुपारी तीन वाजता केली आहे. यावेळी अंदाजे 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई तहसीलदार चंद्रकांत शेळके, गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सानप, तलाठी कृष्णा मुजगुले, स्वप्नील खरात, गोपनीय शाखेचे महेश तोटे, गणेश मुंडे, सचिन साळवे, शहादेव कणसे, अशोक कावळे, महसूल व पोलीस पथकाने केली.
अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रालगत अनेक ठिकाणी अवैधपणे वाळू साठे करण्यात आल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाली होती.

त्यानंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आज दुपारी महसूल व पोलिस पथकाला घेऊन गोदावरी नदी पात्रालगत असलेल्या गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईट व पाथरवाला बुद्रुक येथील बाबाची धडी या ठिकाणी पाहणी केली. यावेळी येथे १०० ब्रास अवैध वाळू साठा आढळून आला. हा साठा जप्त करण्यात आला असून ही कारवाई सायंकाळी साडेसात पर्यंत सुरु होती. अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रालगत आणखी कुठे वाळूसाठा आहे का ? याची पाहणी करणार असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT