मराठवाडा

हिंगोली : गोरेगावात पिसाळलेल्या कुत्र्याचा बालकांवर हल्ला; सात मुले जखमी

Shambhuraj Pachindre

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे (दि.२३) सायंकाळी पाच वाजता मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने सात बालकांवर हल्ला करत चावा घेतला. या कुत्र्याने वेगवेगळ्या ठिकाणी या बालकांवर हल्ला केल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी झालेल्या बालकांना हिंगोली येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारले.

गोरेगाव येथे गेल्या काही महिन्यापासून अंगावर खाज खरुज असलेसे जखमी अवस्थेतील मोकाट कुत्री मुक्तसंचार करीत आहेत. यातील एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील विविध ठिकाणी असणाऱ्या लहान सात बालकांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतला. यात घरातील  अंगणात खेळणाऱ्या तसेच बाजारा निमित्त बाहेरील गावांवरुन आलेल्या बालकांचा समावेश आहे.

जखमी बालकांना गोरेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणी लस उपलब्ध नसल्याने. त्यांना हिंगोली येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून गावकऱ्यांनी पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारले. मात्र, गावात अद्याप अनेक मोकाट कुत्री फिरत असल्याने गावात दहशतीचे वातावरण आहे. यावर स्थानिक प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT