Hingoli Crime News : जवळा बाजारमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून; आरोपीचा शोध सुरू Pudhari File Photo
हिंगोली

Hingoli Crime News : जवळा बाजारमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून; आरोपीचा शोध सुरू

पोलिसांना या घटनेतील महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून आरोपीच्या अटकेनंतरच खूनाचे नेमके कारण समोर येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Young Man Murdered by Crushing with a Stone in Jawala Bazar; Search for Accused Underway

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे एका २६ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांना या घटनेतील महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून आरोपीच्या अटकेनंतरच खूनाचे नेमके कारण समोर येणार आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील इदगाह रोडवर शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, जमादार राजू ठाकूर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता सदर मृतदेह मनोहर साखरे (२६) या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून खून केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून रुग्णालयाजवळ खून करून मृतदेह इदगाह रोडवर टाकण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे माहिती घेत खूनाचे महत्वाचे धागेदोरे मिळविले असून त्यानुसार संशयीतांचा शोध सुरु केला आहे.

या प्रकरणातील संशयात हाती लागल्यानंतरच खूनाचे नेमके कारण समजू शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे जवळा बाजार परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT