Hingoli Crime| उमरदरी शिवारातील तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली

लोणार येथील तरुणाचा मृतदेह असल्याचे स्पष्ट
Crime  News
Crime News pudhari
Published on
Updated on

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील उमरदरी शेत शिवारात बुधवारी सकाळी मृत अवस्थेत आढळून आलेल्या तरुणाची ओळख पटली असून सदर मृतदेह विदर्भातील लोणार येथील सचिन राजगुरू या तरुणाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या खुनाचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सेनगाव तालुक्यातील उमरदरी फाट्याजवळ एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाचे वय सुमारे पंचवीस वर्षे असून त्याच्या उजव्या हातावर सचिता व एक पाऊल गोंदलेले (टॅटू )काढला असून तर दुसऱ्या हातावर मॉम डॅड व आई वडील लहान मुलाचा हात धरलेला असे छायाचित्र (टॅटू) काढलेले होते.

Crime  News
Hingoli Crime | सेनगाव तालुक्यात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सेनगावचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ पाटील,जमादार जीवन मस्के, सुभाष चव्हाण, ओमनाथ राठोड, अमोल चिकने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्याचे प्रयत्न चालवले होते.

यासोबतच पोलिसांनी मृतदेहाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. उमरदरा शिवारापासून विदर्भ सीमा लागूनच असल्यामुळे पोलिसांनी विदर्भातही मृतदेहाची माहिती व्हायरल केली होती. मृतदेहाची ओळख पटेपर्यंत मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातील शवागारामध्ये ठेवण्यात आला.

Crime  News
Washim Crime | मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली आढळलेला मृतदेह पंचाळा येथील तरुणाचा; हत्येचे गूढ उकलणार

दरम्यान रात्री उशिरा मृतदेहाची ओळख पटली असून सदरील मृतदेह लोणार येथील सचिन राजगुरू या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असल्याचे सांगितले. मयत सचिन हा पुणे येथे कामाला होता. मागील पाच वर्षांपासून तो गावाकडे राहू लागला होता. त्याचा विवाह झाला होता मात्र काही कारणामुळे फारकत झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.

  • स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार धनंजय क्षीरसागर, भुजंग कोकरे, आकाश टापरे, विशाल खंडागळे,साईनाथ कंठे, हरिभाऊ गुंजकर, गजानन पोकळे यांचे पथकही अधिक माहिती घेण्यासाठी लोणारकडे रवाना झाल्याचे पोलिस विभागाच्या वतीने सांगण्यात आले. अनैतिक संबंधातून खून झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news