Rameshwar Tanda Koparwadi road accident
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा ते कोपरवाडी रस्त्यावर सोमवारी (दि. १५) सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
रामेश्वर तांडा येथील बेबीबाई अशोक पवार (वय ४२) या शेतातून घरी परतत असताना कोपरवाडीच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला.
या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांना देण्यात आली. मंगळवारी सकाळी जमादार सुनील रिठे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ताराचंद जाधव यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. या प्रकरणी पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध व पुढील तपास सुरू आहे.