बेसुमार वाळू साठ्यावर ताबा कुणाचा? प्रशासनाचा की रेतीमाफीयांचा? जनतेचा सवाल.. file photo
हिंगोली

Illegal sand stock : बेसुमार वाळू साठ्यावर ताबा कुणाचा? प्रशासनाचा की रेतीमाफीयांचा? जनतेचा सवाल..

अधिकृत रेती घाटावरून शिल्लक पावतीच्या नावाखाली बेसुमार हजारो ब्रास रेतीसाठा

पुढारी वृत्तसेवा

Who controls the massive sand stockpiles—the administration or the sand mafia? People's question..

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा सेनगाव तालुक्यात अवैध मार्गाने बेसुमार रेतीसाठा केला असून त्या रेती साठ्यामधून व नव्याने उपसा करून त्यांची बिनधास्तपणे बेभाव विक्री रात्रंदिवस केली जात आहे. या संपूर्ण मालिकेने सेनगाव तालुक्यात कहर केला असून सेनगाव तालुक्यातील अधिकृत रेती घाटावरून शिल्लक पावतीच्या नावाखाली बेसुमार हजारो ब्रास रेतीसाठा करण्यात आला असून या रेती साठ्यावर कुणाचा ताबा? प्रशासनाचा की रेतीमाफियाचा!? असा सवाल तालुक्यातील थेट जनतेतून विचारला जात आहे.

सेनगाव तालुक्यात जिल्हा महसूल प्रशासनाकडून अधिकृत रेती घाटाचा लिलाव करण्यात आला होता त्यामध्ये सेनगाव तालुक्यातील दहा रेतीघाट लिलावामध्ये होते. त्यामध्ये पूर्णा नदी पात्रामध्ये लिंबाळा हुडी, लिंबाळा आमदरी, चिखलागर, ब्रम्हवाडी, बन, वझर खुर्द, पिंपरी बरडा, पेनगंगा नदीमधून वायचाळ पिंपरी, भगवती, गुगुळ पिपरी हे रेती घाट अधिकृत निलावामधून रेती उपशासाठी देण्यात आले होते. या रेती घाटातून एकूण 25 हजार 619 ब्रास अधिकृत रेती उत्खनन करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती.

या लिलावा दरम्यान अधिकृत लिलावधारकांनी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेल्या रेतीघाटावरुन रेती उत्खलन करण्यासाठी काही अटी व शर्ती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या, परंतु लिलावधारकाकडून जिल्हा प्रशासनाने ठेवलेल्या अटी व शर्तीचे भंग केला असल्याचा ठपका जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. लिलावधारकांनी अधिकृत रेती उत्खनन करण्यासाठी दिलेली उत्‍खननाची रेतीची परवानगी मर्यादित असताना सुद्धा लिलावधारकांनी त्यापेक्षा जास्त रेती उत्खनन करून त्यांची चढ्या भावाने विक्री केली असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

दिवसभर एकच पावती वापर करून शासनाची प्रचंड दिशाभूल केली असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. शासनाने परवानगी दिलेल्या व मोठ्या प्रमाणात विक्री केलेल्या रेतीचा जिल्हा प्रशासनाकडे रीतसर हिसाब अथवा सीसीटीव्ही फुटेजची मागणी जिल्हा प्रशासनाने लिलावधारकांकडे केली असता अद्यापपर्यंत लिलावधारकांनी जिल्हा प्रशासनाकडे कुठलेही खुलासा अथवा पत्रव्यवहार केला नसल्याचे माहिती प्राप्त आहे. परंतु या लिलावधारकांनी शिल्लक पावतीच्या नावाखाली तालुक्यात अनेक ठिकाणी त्यामध्ये ब्रह्मवाडी, चिखलाकर, लिंबाळा हूडी, बन, वझर, पिंपरी बरडा, वायचाळ पिपरी या ठिकाणी अवैध मार्गाने शासनाचा महसूल बुडवून हजारो ब्रासचा रेतीसाठा केला असल्याचा धक्कादायक प्रकार सेनगाव तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

या रेतीसाठ्याची प्रशासनाकडून जीटीएस मोजणी यंत्राद्वारे केली असून हा बेसुमार रेतीसाठा कुणाच्या ताब्यात? प्रशासनाच्या की रेतीमाफीयांच्या? हे मात्र अन्नभिन्न पाहावयास मिळत आहे. या साठवलेल्या रेती साठ्यातून प्रतिदिन रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात रेती टिप्पर भरून विक्री केली जात आहे. या अवैध रेती विक्री मागे मदत कुणाची याची तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. या रात्रंदिवस अवैध रेती विक्रीला लगाम कधी लागणार? व कोण लावणार याकडे पाहणे गरजेचे झाले असून गोरगरीब व घरकुल लाभार्थी यांना मात्र आवाच्या सव्वा भावाने रेती विकत घेऊन आपले निवारा पूर्ण करण्याचे प्रयत्न लाभार्थी करताना पहावयास मिळत आहे. तालुक्यात होत असलेली अवैध रेती विक्री याला अभय कोणाचे आर्थिक सहकार्य कुठल्या विभागाला हे मात्र विशेष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT