Hingoli News : अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाकडून जप्त!

औंढा नागनाथ तालुक्यात महसूल विभागाची कारवाई; ६ लाख ५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Hingoli News : अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाकडून जप्त!
Published on
Updated on

औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास पुरजळ ते शिरला रस्त्यावर अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर मार्गावर पाहणी केली असता, विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर हेड व ट्रॉलीच्या साहाय्याने अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना आढळून आला. कर्मचाऱ्यांनी तत्काळ ट्रॅक्टर अडवून जप्त केला.

चौकशी केली असता ट्रॅक्टरधारकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे महसूल विभागाच्या वतीने अवैध रेती वाहतुकीप्रकरणी संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी महसूल मंडळ अधिकारी अर्चना पटवे यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक-मालक आदिनाथ सुधाकर वाघ (वय २७ वर्षे, रा. नालेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण ६ लाख ५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नाईक करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news