Road Safety Demand
औंढा नागनाथ : येथील विश्रामगृहापासून बस स्थानकापर्यंतचा प्रमुख राज्य रस्ता सामान्य जनतेत संताप व्यक्त करणारा बनला असून, तर बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे रस्त्याची वाताहात झाली असून या रस्त्यावरून गाडी चालवावी की नाही असे प्रश्न निर्माण होत असल्याने संबंधित रस्ता अपघात प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावा अशी मागणी नागरीकातून होत आहे.
चार जिल्ह्याला जोडणारा हा हिंगोली ते परभणी मुख्य मार्ग असून बांधकाम उपविभागाच्या समोर पंधरा ते वीस मीटरच्या अंतरावरील विश्रामगृहापासून बस स्थानकापर्यंतचा प्रमुख राज्यरस्ता अगदी खड्डेमय बनला आहे. सर्वत्र रस्ता उखडला गेला असून उजव्या बाजूला येणाऱ्या पाण्यामुळे पाणी साचून मोठे खान पाण्याचे डबके तयार झाले आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामुळे या खड्ड्यातील घाण पाणी प्रवासी वाहन चालक आणि पायदळ चालकांच्या अंगावर येत आहे .
शिवाय परभणी कडे जाणाऱ्या एका रस्त्यावर मोठे खोल भगदाड पडले असून ते भरल्या गेले मात्र त्यालाही थातुर मातुर भरल्याचे दिसून येत आहे. याच रस्त्यावरून विविध रुग्णालये, औषधी चे दुकान, लॉज, हॉटेल, खानावळ, अशी विविध प्रतिष्ठाने असून याच रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने अपघात होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. प्रवाशांमधून एवढ्याच रस्त्यासाठी अपघात प्रणव क्षेत्र जाहीर करण्याची मागणी होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबीची दखल घेऊन त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी जनसामान्यातून होत आहे.