Vasmath milk price pudhari photo
हिंगोली

Vasmath milk price : वसमतमध्ये खुले दूध ९० रुपये लिटर

शेजारील काही शहरांमध्ये दूध तुलनेने कमी दरात उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

वसमत : शहरात खुले दूध ९० रुपये प्रतिलिटर दराने विकले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारील काही शहरांमध्ये दूध तुलनेने कमी दरात उपलब्ध असताना वसमतमध्ये दर अधिक का आहेत, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

दूध हा प्रत्येक घरातील दैनंदिन गरजेचा पदार्थ असल्याने दरवाढीचा थेट परिणाम घरगुती अर्थसंकल्पावर होत आहे. विशेषतः मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबांना वाढलेल्या दराचा आर्थिक फटका बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर मिळणारा दर आणि ग्राहकांकडून आकारला जाणारा दर यामध्ये मोठी तफावत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. उत्पादन खर्च, पशुखाद्य, वाहतूक, मजुरी आणि वितरण व्यवस्थेचा खर्च यामुळे दर वाढत असल्याचे विक्रेते सांगत असले तरी ग्राहकांना याबाबत अधिक पारदर्शक माहिती मिळावी, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाला योग्य मोबदला मिळावा आणि ग्राहकांनाही वाजवी दरात दूध उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दूध दरातील वाढत्या तफावतीची संबंधित विभागाने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांतून पुढे येत आहे.

  • हिंगोली मध्ये ५० रुपयांपासून ७० रुपये, नांदेडमध्ये ८० रुपये लिटर, परभणी ७५ ते ८० रुपये प्रति लिटर असे दर आहेत मग वसमत येथेच ९० रुपये दर कसे असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT