Maratha Reservation pudhari photo
हिंगोली

Maratha reservation | मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ वसमत तहसीलसमोर होणार पोळा सण; सकल मराठा समाजाचे आवाहन

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ वसमत तहसीलसमोर होणार पोळा सण; सकल मराठा समाजाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

वसमत : बळिराजाचा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा सण असलेला ‘बैलपोळा’ यंदा वसमत तालुक्यात एका वेगळ्या आणि ऐतिहासिक स्वरूपात पाहायला मिळणार आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्याला खंबीर पाठिंबा दर्शवण्यासाठी यंदाचा पोळा सण वसमत तहसील कार्यालयासमोर साजरा करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण करणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील तसेच वसमत तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेले रविकिरण वाघमारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा अनोखा पोळा सण पार पडणार आहे.

बैलजोड्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

वसमत तालुक्यातील शेतकरी आणि सकल मराठा बांधवांनी आपल्या सजविलेल्या बैलजोड्यांसह या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एरवी आपापल्या गोठ्यात आणि शेतात साजरा होणारा पोळा यंदा हक्काच्या आरक्षणासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात साजरा होणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT