कळमनुरीत गोवंश मांस विक्री, दोन जण ताब्यात  File Photo
हिंगोली

Hingoli Crime News : कळमनुरीत गोवंश मांस विक्री, दोन जण ताब्यात

दोन संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Two arrested for selling beef in Kalamanuri

कळमनुरी : पुढारी वृत्तसेवा शहरातील नुरी मोहल्ला, दर्गा रोड परिसरात अवैधरित्या गोवंश कत्तल करून गोमांस विक्री होत असल्याच्या माहिती वरून पोलिसांनी घटनास्थळी पोहचत गोवंश मांस एक बैल जप्त केले. तसेच दोन संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे.

आज 23 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नुरी मोहल्ला, दर्गा रोड येथे बाबू कुरेशी व मोहम्मद अमेर आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या गोवंश कत्तल करून गोमांस विक्री करीत असल्याचे आढळून आले. एक बैल कत्तलीसाठी बांधून ठेवत त्याला चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता आखूड दोरीने बांधून ठेवून त्याच्यावर निर्दय वागणूक दिल्याचेही निदर्शनास आले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे 43 किलो गोमांस, वजन काटा व अंदाजे 50 हजार रुपये किमतीचा एक बैल असा एकूण 62,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त आला प्रकरणी पुढील तपास पोलीय जमादार रवी इंगोले हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT