उघड्यावर मांस विक्री; १८ विक्रेत्यांना नोटीस

Jalana News | महापालिकेची मोहीम; २४ तासांचा अल्टिमेटम
meat sale ban
meat sale banPudhari Photo
Published on
Updated on

जालना : शहरातील नूतन वसाहत व घाटी रोड परिसरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध जालना शहर महानगरपालिकेने धडक कारवाई हाती घेतली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन ही संयुक्त मोहीम बुधवार, दि. २२ रोजी राबविण्यात आली. या कारवाईत १८ मांस विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

नूतन वसाहत येथील उड्डाणपूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर तसेच घाटी रोड भागात उघड्यावर चिकन, मटण व मासे विक्री सुरू होती. यामुळे परिसरात अस्वच्छता पसरत असून, उघड्यावर टाकलेल्या मांसामुळे भटके कुत्रे आक्रमक बनून नागरिक व लहान मुलांवर हल्ले करत असल्याचे निदर्शनास आले.

आयुक्तांच्या आदेशान्वये व उपायुक्त त्र्यंबक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता व अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई केली. यावेळी दुकानांसमोरील अनधिकृत शेड व अतिक्रमणे हटविण्यात आली. उर्वरित विक्रेत्यांना स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली असून, अन्यथा महानगरपालिका थेट कारवाई करणार असल्याचे स्वच्छता विभागप्रमुख चांदणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news