Santosh Bangar's immoral relationship with women; MLA Mutkule's shocking claim
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा :
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे महिलांसोबत अनैतिक संबंध ठेवतात. जायभाये नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली, अनेक महिलांसोबत बांगर यांचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केल्याने आमदार मुटकुळे व आमदार संतोष बांगर या सत्ताधारी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत.
अश्लिल शब्दाची सुरूवात कुणी केली हा एक प्रश्न आहे. कळमनुरीत काय झाले हे आ. बांगरने तपासले पाहिजे. जायभाये नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. बायांच्या संदर्भात कळमनुरीमध्ये चर्चा आहे. त्यामुळे तो आता हिंगोलीत प्रयत्न करीत आहे.
तेथे किती लोकांशी अनैतिक संबंध ठेवतो हे तपासले पाहिजे. हे सर्व रेकॉर्ड आपल्याजवळ असल्याचा खळबळजनक दावा आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला आहे. विकास हा संतोष बांगर यांना माहिती नाही, कळमनुरी नगर परिषदेत त्यांना येऊ देत नाहीत. हिंगोलीत बांगर चौथ्या क्रमांकावर जाणार ही निवडणुक आम्हीच जिंकणार आहोत. बांगर यांचा दारूण पराभव होणार आहे. आमची लढत उबठा शिवसेना आणि अ. पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर आहे. असे मुटकुळे म्हणाले