उन्हाळ्यात घरोघरी कुरड्या, पापड, खारोड्या होतात तयार  pudhari photo
हिंगोली

Hingoli News : उन्हाळ्यात घरोघरी कुरड्या, पापड, खारोड्या होतात तयार

रेडिमेड पदार्थ खरेदीकडे वाढला कल

पुढारी वृत्तसेवा

जवळा बाजार : सध्याच परिस्थितीत बाजारपेठेत सर्व वस्तु बरोबरच दैनंदिन जेवणातील पदार्थ सुध्दा खुसखुशीत आस्वाद दर्जेदार पॅकिंग महिला बचत गट माध्यमातून तयार केलेले पदार्थ उपलब्ध होत असल्याने मोठ्याप्रमाणात रेडिमेड पदार्थ खरेदीस मोठ्याप्रमाणात कौल वाढ होत असलेले पहावयास मिळत आहेत.

ग्रामीण भागात उन्हाळ्यात महिलावर्ग मोठ्याप्रमाणात वर्षभर जेवणातील गहू, ज्वारी, तांदूळ , बाजरी या पासून कुरडया, पापड, शेवाळया, खारोडया घरो घरी तयार करून उन्हात घरासमोर, छतावर ठिकठिकाणी वाळवत असलेले पहावयास मिळत असतात.

मात्र कालांतराने मोठ्याप्रमाणात महिला बचत गट व छोटे व्यवसाय धारक कुरडया , पापड, शेवाळया, खारोडया तयार केलेला मोठ्याप्रमाणात गावोगावी व शहरात विविध मॉल, किराणा दुकानात मोठ्याप्रमाणात आकर्षक लहान व मोठया पॅकिंग मध्ये विक्रीस उपलब्ध होत असून या मुळे मोठ्याप्रमाणात बचत गट तयार करत असलयाने ग्रामीण भागात आज पण घरोघरी तयार करण्यात येत आहेत.

कारण उन्हाळ्यात तिन महिने मोठ्याप्रमाणात आंब्यांच्या रसाळी बरोबर पापड्या , खारोडया वापर होत असतो. तर बाजरी खारोडया भाजून खातात तर दररोजच वापर साठी मुग उडीद पापड मोठ्याप्रमाणात उन्हाळ्यात घरोघरी करत होते पण आता मुग उडीद मसालेदार व साधे, डाईट सर्व प्रकारचे आकर्षक पॅकिंग मध्ये स्वादिष्ट पापड दररोजच सर्व सामान्य मंडळीस पाहिजे त्या पॅकिंग मध्ये व शेवाळया सुध्दा बाजारपेठ बारामहिने विक्रीस उपलब्ध होत आहेत.

सध्याच परिस्थितीत महिला बचत गट कडून मोठ्याप्रमाणात कुरडया पापड शेवाळया, खारोडया विविध किराणा दुकान व मॉल पुरवठा करण्यात येत आहे विविध महिला बचत घरगुती लागणारे सर्व पदार्थ तयार करून विक्रीस उपलब्ध करीत असलयाने महिला बचत गट राज्यातच नव्हे तर देशात नावलौकिक प्राप्त करीत आहेत. ग्रामीण भागात उन्हाळ्याचा सुरुवातीलाच म्हणजे मार्च महिन्यात घरोघरी गहु, तांदूळ, बाजरी, ज्वारी तयार केलेला कुरूडा, पापड,शेवाळया, खारोडा वाळवला जातात छतावर, अंगणात, गच्चीवर या तयार केलेला पदार्थ वाळवण महिलावर्ग लगबग पहावयास मिळत असते.

उन्हाळ्यात तिन महिने आंबाचा रसा बरोबर कुरूडया व पापड आस्वाद घेत असतात तर बाजरीचा खारोडया भाजून कांदा बरोबर नाष्टा मोठ्याप्रमाणात घेत असतात तर मुग उडीद दाळी पासून विविध प्रकारचे चवदार पापड तयार करण्यात येत असतात. राज्यात महिला बचत गट माध्यमातून विविध पदार्थ मोठ्याप्रमाणात तयार करण्यात येत असतात.

घरगुती व चवदार पदार्थ महिला बचत गटातील महिलावर्ग तयार केलेला पदार्थ राज्यात नव्हे तर देशात मोठ्याप्रमाणात खरेदी करण्यात येत आहेत आज रेडीमेड पदार्थ तयार सहज उपलब्ध होत आहेत पण घरगुती कुरडया पापड चव वेगळीच असते. आज सुध्दा घरोघरी हे पदार्थ तयार करण्याची पंरपरा आज सुध्दा सुरू आहेत .

रेडीमेड उत्पादित पदार्थ वापर वाढला असला तरी घरगुती आस्वाद आज सुध्दा अनेकांना खाण्यास आकर्षित करतो. एकंदरीतच ग्रामीण भागात कुरडया पापड खारोडया शेवाळया कमी प्रमाणात घरोघरी तयार करण्यात आहे. कारण उन्हात वाळवणे, कामाची दगदग, घरातील महिलावर्ग मोठ्याप्रमाणात काम असलयाने आता घरोघरी कुरडया पापड, शेवाळया, खारोडया तयार करण्या पेक्षा रेडीमेड बाजार पेठ मधुन खरेदीस कौल मोठ्याप्रमाणात वाढ होत आहेत. पण आज सुध्दा घरातील स्वादिष्ट चव रेडीमेड पदार्थ नसल्याने घरोघरीच कुरडया पापड्या शेवाळा खारोडा मोठ्याप्रमाणात करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT