Hingoli Crime News : कोपरवाडी शिवारात पंजाब मोरेची निघृण हत्या File Photo
हिंगोली

Hingoli Crime News : कोपरवाडी शिवारात पंजाब मोरेची निघृण हत्या

पैशांच्या व्यवहारातूनच खून, दोघांना घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Punjab More brutally murdered in Koparwadi Shivara

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : पोलिस ठाण्यांतर्गत कोपरवाडी शिवारातील पंजाब मोरे खून प्रकरणाला अखेर चार दिवसांनंतर वाचा फुटली असून या प्रकरणात दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पैशाच्या देवाण-घेवाणीवरून हा खून झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.

आखाडा बाळापूर हद्दीत कोपरवाडी परिसरातील जंगलातून जाणाऱ्या रोड लगत असलेल्या नाल्यामध्ये एक अनोळखी मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत १ डिसेंबर रोजी सापडला होता. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व उप विभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन सदरचा प्रकार खुन सदृश्य वाटत असल्याने, अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघड करण्यासंदभनि गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, विष्णुकांत गुड्डे, यांच्या पथकाने अधिक माहिती घेतली असता सदर मृतदेह आखाडा बाळापूर येथील पंजाब मोरे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

घटनास्थळावर कुठलाही पुरावा नसल्याने या खुनाचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोउपनि गणेश गोटके, पोलिस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, साईनाथ कंटे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, शिवाजी जालमिरे, हरिभाऊ गुंजकर ज्ञानेश्वर गोरे, शिवाजी पवार, दत्ता नागरे, प्रदीप झुंगरे, मारोती काकडे यांच्या पथकाने अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली होती.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व इतर बाबींची तपासणी केली. त्यानंतर या प्रकरणात सुदर्शन श्रीहरी फड (३५ रा. शिक्षक कॉलनी आ. बाळापूर) व त्याचा साथीदार जियाउल्लाखान खाजाखान (रा आखाडा बाळापूर) यांची चौकशी सुरू केली. मयत पंजाब यांच्या सोबत असलेल्या आर्थीक देवाण घेवाणीच्या व्यवहारावरून नियोजनबध्द सदरचा खून केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. त्यावरून दोघांनाही अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT