Online registration slow due to server down
जवळा बाजार, पुढारी वृत्तसेवा : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचा यार्डात खरेदी विक्क्री संधामध्ये एनसीसीएफ अंतर्गत सोयाबीन विक्रीस नोंदणीस मोठ्याप्रमाणात गर्दी असून पहिल्याच दिवसांपासून साईट सुरळीत चालत नसल्याने मोठ्याप्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.
जवळाबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील यार्डात औंढानागनाथ तालूका खरेदी विक्री संघ कडून ५ नोव्हेंबर पासून एन सी सी एफ अंतर्गत शासनाचा हमी भाव मध्ये सोयाबीन खरेदीस ऑनलाईन नोंदणी सुरूवात झाली असून दररोजच सकाळपासूनच शेतकरी बांधवाकडून खरेदी विक्री संघ समोर मोठ्याप्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे.
आता खरेदी केंद्र अंदाजे १५ नोव्हेंबर जवळपास सुरू करण्यात येणार आहे अशी चर्चा नोंदणी केंद्रावर शेतकरी बांधव सुरू आहे राज्य शासनाकडून शेतकरी बांधवाकडून हमी भाव मध्ये खरीप व रब्बी हंगामातील उत्पादित माल खरेदीस केंद्र सुरू करण्यात येत असतात पण या वर्षी निसर्ग अवकृपातून खरीप हंगामातील मोठ्याप्रमाणात पिकाचे उत्पन्न कमी प्रमाणात झाले आहेत.
त्यातच शासनाकडून लवकर हमी भाव माल खरेदी केंद्र सुरू केली असती तर शेतकरी बांधवास आडत बाजारपेठ कमी भाव माल विक्रीस घेऊन जाण्याची वेळ आली नसते पण अजुन तरी खरेदीस केंद्र सुरू होण्यास विलंब होत आहे आजचा परिस्थितीत शेतकरी बांधवांकडून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात झाली असून आता खरेदी केंद्र सुरू होण्यास कधी श्रीगणेश होणार याची शेतकरी बांधवास प्रतिक्षा करावी लागणार आहे.
बायोमेट्रिक फिगर घेण्यात येत असून साईट काम बरोबर करत नसल्याने नोंदणीस पूर्ण प्रकिया विलंब होत असून आतापर्यंत ७००ते ७५० शेतकऱ्याचे वायोमेट्रिक घेण्यात आली अशी माहिती खरेदी विक्री संघामधील कर्मचारीवर्गाने दिली आहे.