शिवाजी गुठे Pudhari
हिंगोली

Hingoli Accident | नांदेड- हिंगोली महामार्गावर टँकरची पाठीमागून धडक; दुचाकीवरील आयटीआय कॉलेजचा लिपिक ठार

ITI College Clerk Death | कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे अपघात

पुढारी वृत्तसेवा

Nanded Hingoli Highway Accident

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे नांदेड–हिंगोली महामार्गावर आज (दि. 2) सकाळी 10 च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

एटीएल (केटीएल) कंपनीच्या टँकरने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार टँकरच्या चाकाखाली सापडल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. या अपघातात शिवाजी बापूसराव गुठे (वय 33, रा. गुठेवाडी, ता. कंधार, जि. नांदेड) यांचा मृत्यू झाला. ते उमरखेड येथील आयटीआय कॉलेजमध्ये लिपिक पदावर कार्यरत होते.

मयत शिवाजी गुठे हे सकाळी आपल्या गावाकडून उमरखेडकडे एमएच 26 सीबी 7734 क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना भाटेगावजवळ हा अपघात झाला. पाठीमागून आलेल्या एमएच 04 एफडी 6661 क्रमांकाच्या केटीएल कंपनीच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, डोंगरकडा येथे पाठविण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन खान यांनी शवविच्छेदन केले.

अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार व पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिस्थिती हाताळत दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत केली.

मयत शिवाजी गुठे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT