Monsoon 2025 |
जवळाबाजार : भारतामध्ये प्रत्येक शुभकार्यासाठी खास दिवस निवडला जातो, मग निसर्गही काय मागे राहणार? यंदा पावसाने एक अनोखा योग घडवला आहे. सलग सात पावसाळी नक्षत्रांचा प्रारंभ शनिवार या दिवशी होत आहे, जो एक विलक्षण योगायोग मानला जात आहे.
खेळात ‘हॅट्ट्रिक’चं महत्त्व असतं, आणि या वर्षी वरुणराजाने थेट 'शनिवारी हॅट्ट्रिक'ची मालिका रचली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा पावसाळा चांगला आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे.
८ जून – मृग नक्षत्र (रविवार)
२२ जून – आर्द्रा नक्षत्र (रविवार)
५ जुलै – पुनर्वसू नक्षत्र (शनिवार)
१९ जुलै – पुष्य नक्षत्र (शनिवार)
२ ऑगस्ट – आश्लेषा नक्षत्र (शनिवार)
१६ ऑगस्ट – मघा नक्षत्र (शनिवार)
३० ऑगस्ट – पूर्वा नक्षत्र (शनिवार)
१३ सप्टेंबर – उत्तरा नक्षत्र (शनिवार)
२७ सप्टेंबर – हस्त नक्षत्र (शनिवार)
१० ऑक्टोबर – चित्रा नक्षत्र (शुक्रवार)
२४ ऑक्टोबर – स्वाती नक्षत्र (शुक्रवार)
शनिवारपासून पुढे चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांश भागांत वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरू होतील, असा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात उकाडा कायम असून, शुक्रवारी अकोला, जळगाव, सोलापूर येथील कमाल तापमान 44, तर पुणे शहरात यंदाच्या मे महिन्यातील विक्रमी 43 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
असे आहेत पावसाचे यलो अलर्ट
कोकण (5 ते 8 मे)
मध्य महाराष्ट्र (3 ते 8 मे)
मराठवाडा (3 ते 8 मे)
विदर्भ (3 ते 6 मे)