Sexual Assault Case  File Photo
हिंगोली

Sexual assault case : विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

नराधमाला गोरेगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाला गोरेगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि. 6) पहाटे बेड्या ठोकल्या आहेत. गणेश पायघन असे या आरोपीचे नाव असून, त्याने लग्नास नकार दिल्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

सदर विवाहिता काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली असताना, गणेश तिथेही पोहोचला. तिथे त्याने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर पीडितेने लग्नासाठी तगादा लावला असता, आरोपीने तिला टाळण्यास सुरुवात केली आणि लग्नास स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने हा सर्व प्रकार आपल्या माहेरच्या मंडळींना सांगितला आणि गुरुवारी रात्री पोलीस ठाणे गाठले.

पहाटेच पोलिसांची झडप

या घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे यांच्या पथकाने तातडीने तपासचक्र फिरवले. पोलिसांनी गावात शोध घेऊन शुक्रवारी पहाटे आरोपी गणेश पायघन याला ताब्यात घेतले. त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक लेनगुळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मैत्रीचा फायदा घेत केला विश्वासघात

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील विवाहित महिला कामावर जात असताना आरोपी गणेश पायघन याने तिच्याशी मैत्री केली होती. या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमसंबंधात झाले. “तुझ्या कुटुंबाला सोडून दे, मी तुझा सांभाळ करेन आणि तुझ्याशी लग्न करेन,“ असे खोटे आमिष दाखवून त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT