मनोज जरांगे पाटील हिंगोली येथे बोलताना Pudhari Photo
हिंगोली

Manoj Jarange | एकाजरी मराठा आंदोलकाला हात लावला... तर मुख्यमंत्र्यांसह आमदारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही !

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा हिंगोलीच्या पत्रकार परिषदेत इशारा : मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडकणार

पुढारी वृत्तसेवा

If anyone touches a Maratha protester... the Chief Minister and MLAs will not be allowed to roam around Maharashtra!

हिंगोली ः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता थेट मुंबई येथे मराठा समाज धडकणार आहे. या मोर्चात एकाही तरुणाला काठी लागली तर मराठा समाज मुख्यमंत्र्यांसह आमदारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोली येथे दिला. हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबईमधील नागरिकांना त्रास व्हावा हा उद्देश नाही

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आमची लढाई सुरू आहे. या मागणीसाठी आता राज्यातील सर्व मराठा बांधव मुंबईत धडकणार आहेत. मुंबईमधील नागरिकांना त्रास व्हावा हा आमचा उद्देश नाही. आमच्या आरक्षणाच्या मागणीचा त्यांनाही फायदा होणार आहे. आम्हाला न्याय देणारी मुंबई आहे प्रत्येक जण न्यायासाठी मुंबईत आंदोलन करतात. त्यानुसारच आमचे आंदोलन आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आंदोलनासाठी सरकारला दोष द्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र कर्जमाफी का केली नाही असा सवालही त्यांनी केला.

राज्यामध्ये ओबीसी व मराठा यांच्यामध्ये वाद पेटवला जात आहे. मात्र आपण सर्व एकाच गावात राहतो. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतो. त्यामुळे आपसामध्ये वाद करून घ्यायचं नाही असेही त्यांनी सांगितले. राज्यातील इतर समाजाने त्यांच्या प्रश्नांसाठी मदत मागितली तर त्यांच्या प्रश्नासाठी ही आंदोलन करणार असल्याची ही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कोणालाही पाडा किंवा निवडून आणा असे म्हटले नाही. कारण सत्ताधारी व विरोधक कोणीही आरक्षण देतो असे म्हटले नव्हते. त्यामुळे आम्हाला आरक्षणासाठी संघर्ष करावा लागणार हे स्पष्ट दिसत होते. मात्र मराठा दलित मुस्लिम हे समीकरण जुळले असते तर वेगळे चित्र पहायला मिळाले असते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठा आंदोलक मुंबईत आल्यानंतर पोलीस पाहून घेतील फडणवीस यांच्या वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. फडणवीस यांनी आम्हाला धमकी देऊ नये. आमच्या नादाला अजिबात लागू नये आंदोलनामध्ये एकाही तरुणाला काठी लागली तर राज्यातील मराठा समाज मुख्यमंत्र्यांसह मंत्री व आमदारांना राज्यभरात फिरणे बंद करेलअसा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT