Hingoli News : औंढा नागनाथ तालुक्यातील ३८ वर्षीय शेतकऱ्याचे अपहरण file photo
हिंगोली

Hingoli News : औंढा नागनाथ तालुक्यातील ३८ वर्षीय शेतकऱ्याचे अपहरण

पत्नीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Kidnapping of a 38-year-old farmer from Aundha Nagnath taluka

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील उखळी येथे २ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता घराजवळून एका ३८ वर्षीय शेतकऱ्याचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे औंढा नागनाथ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात ११ दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामप्रसाद बाबुराव आंधळे (वय ३८, व्यवसाय शेती, रा. उखळी, ता. औंढा नागनाथ) असे अपहरण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी मुक्ता रामप्रसाद आंधळे यांनी १३ नोव्हेंबर रोजी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ता आंधळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास उखळी येथील राहत्या घराजवळून रामप्रसाद आंधळे यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून त्यांना उचलून नेले.

अपहरणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात अद्याप नेमके आरोपींची ओळख पटलेली नसून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तालुक्यातील शेतकऱ्याच्या अपहरणाच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT