Friend’s Marriage Celebration
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर येथे 22 जुलै रोजी सकाळी शेवाळे येथील एका 26 वर्षीय युवकांनी आपल्या मित्राचे लग्न जमल्याच्या खुशीमध्ये तलवारीचे प्रदर्शन करीत असताना पोलिसांना आढळून आला म्हणून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेवाळा येथील शेख जाबेर व शेख जुबेर यांनी आपल्या मित्राचे लग्न जमले या खुशीमध्ये स्थानकाच्या बाजूच्या रस्त्यावरील मोकळ्या जागेत दोन तलवारी हातात घेऊन प्रदर्शन करत होते.
ही माहिती आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, जामदार शेख अन्सार, शिवाजी पवार, दिलीप मस्के यांनी गावातील नागरिकांनी कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन शेख जाबेर शेख जुबेर यास स्वतःच्या जवळ बेकायदेशीर रित्या दोन तलवार मिळून आल्या. 27 इंच लांबीच्या दोन तलवारीसह शेख जाबेर व शेख जुबेर यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आखाडा बाळापुर भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.