Soybean Crop : सोयाबीन पिकावर 'यलो मोझेंक'चा वाढता प्रादुर्भाव  File Photo
हिंगोली

Soybean Crop : सोयाबीन पिकावर 'यलो मोझेंक'चा वाढता प्रादुर्भाव

सव्वा दोन लाख हेक्टरवरील सोयाबीनला फटका

पुढारी वृत्तसेवा

Increasing incidence of 'Yellow Mozenk' on soybean crop

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा यंदाच्या खरीप हंगामात सव्वा दोन लाख हेक्टरवर सोयाबीनचे पीक घेण्यात आले आहे. मात्र या हंगामात सततचा पाऊस व वातावरणात सातत्यानं बदल होत असल्याने सोयाबीन पिकावर विषाणूजन्य यलो मोझेंक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदा पावसाने मे महिन्यात हजेरी लावली. त्यामुळे जवळपास सर्वच खरिप हंगामातील क्षेत्रात जून व जुलै महिन्यात पेरणी झाली. यानंतरही जुलै महिन्यात पावसाचा खंड पडला तर ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने जोर धरला. त्यामुळे सोयाबीन जोमात असताना आता सोयाबीन पिकावर विषाणूजन्य यलो मोॉक रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन सव्वा दोन लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. येलो मोॉक रोगाचा प्रादुर्भावाने झाडांची पाने आकाराने लहान होत आहेत. पानांचा काही भाग हिरवट तर काही पिवळसर दिसून येत आहे. पानांच्या शिराजवळ पिवळ्या रंगांचे डाग दिसत असून प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ पूर्णपणे खुंटत असल्याचे दिसत आहे.

पाने सुरकत्या पडून ती ओबडधोबड होतात. त्यामुळे झाडांना शेंगा कमी प्रमाणात लागत आहेत. शेंगामध्ये दाणे भरत नाहीत किंवा आकाराने लहान दाणे भरतात. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बळीर- ाजाच्या अपेक्षेवर पाणी फेरले असल्याचे चित्र आहे.

कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे. प्रादुर्भावग्रस्त पाने वेळोवेळी काढून नष्ट करावीत. जेणेकडून निरोगी झाडांवर होणारा रोगाचा प्रसार टाळला जाईल. आंतरपीक व मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास रोगाचे प्रमाण कमी करणे शक्य होते. बिगर हंगामी सोयाबीन लागवड टाळावी. जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात अडथळे येऊन पुढील हंगामात होणारा रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT