Kavad Yatra : कावड यात्रेत शिवभक्तांची अलोट गर्दी, ठिकठिकाणी स्वागत, बम बम भोलेचा जयघोष  File Photo
हिंगोली

Kavad Yatra : कावड यात्रेत शिवभक्तांची अलोट गर्दी, ठिकठिकाणी स्वागत, बम बम भोलेचा जयघोष

सोमवारी सकाळी महापूजा झाल्यानंतर कावड यात्रा हिंगोलीकडे रवाना झाली.

पुढारी वृत्तसेवा

Huge crowd of Shiva devotees during Kavad Yatra, welcome at various places, shouts of 'Bam Bam Bhole'

हिंगोली / कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा: कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर येथे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सोमवारी सकाळी महापूजा झाल्यानंतर कावड यात्रा हिंगोलीकडे रवाना झाली. तब्बल १८ किलोमीटरच्या कावड यात्रेत जिल्हाभरातील हजारो शिवभक्त सहभागी झाले होते. भक्तांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी चहापाणी व नाश्त्याच्या व्यवस्था करण्यात आली होती. कावड यात्रेत ढोल, ताशांच्या गजरात तसेच बम बम भोलेच्या जयघोषाने भक्तांच्या उत्साह संचारला होता.

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आमदार संतोष बांगर यांच्यावतीने कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील कयाधू अमृतधारा महादेव मंदिर या १८ किलोमीटर अंतराची कावड यात्रा काढली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी कावडयात्रा काढण्यात आली. हिंगोली जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील भाविक सोमवारी सकाळपासूनच कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिराजवळ एकत्र आले होते. सकाळी आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी आमदार राजेश नवघरे, अॅड. मनीष साकळे, माजी सभापती श्रीराम बांगर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम, गुड्डू बांगर, संजय बोंढारे, राजेंद्र शिखरे, अॅड. सुरेश गडदे, सुभाष बांगर, संतोष बेरुळकर, दिनकर गंगावणे, सुधाकर गंगावणे यांच्यासह हजारो भाविक, कार्यकर्ते उपस्थित होते.

कळमनुरी येथे महापूजा झाल्यानंतर कावड यात्रा हिंगोलीकडे निघाली. हर हर महादेव, बम बम बोलेच्या गजरामध्ये कावड यात्रा निघाली. कावड यात्रेत सहभागी झालेल्या हजारो भाविकांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत बदल केला होता. दरम्यान कावड यात्रेतील भाविकांना सिमेंट रस्त्याचा त्रास होऊ नये यासाठी स्प्रिंकलरद्वारे रस्त्यावर पाणी सोडण्यात आले होते. याशिवाय शिवनी, उमरा फाटा, खानापूर, हिंगोली बायपास या ठिकाणी भाविकांसाठी नाश्ता, भोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या व्यवस्थेसाठी हजारो हात सकाळपासूनच कामाला लागले होते.

कावड यात्रेमुळे सोमवारी दुपारी बारा वाजल्यापासून औंढा नागनाथकडून हिंगोली मार्गे वाशिमकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. औंढा नागनाथ कडून वाशिमकडे जाणारी वाहने नीं नामदेव फाटा, सेनगाव, गोरेगाव, कन्हेरगाव नाका मार्गे वाशिम असे जात होते तर वाशिमकडून औंढा नागनाथ व परभणीकडे जाणारी वाहतूक कनेरगाव-गोरेगाव, सेनगाव-नसीं नामदेव फाटा मार्गे औंढा नागनाथ व परभणीकडे अशी वळविण्यात आली होती.

कळमनुरी ते हिंगोली या १८ किलोमीटरचे अंतर पार केल्या नंतर कावड यात्रा दुपारी साडेपाच वाजता हिंगोली शहरात पोहोचली. महाराजा अग्रसेन चौकामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यात्रेमध्ये सहभागी झाले. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास महात्मा गांधी चौकात उपमुख्यमंत्री शिंदे यात्रेतील सहभागी भाविकांसह नागरिकांना संबोधित केले. सायंकाळी भाविकांची गर्दी वाढली होती. तसेच कावड यात्रेत भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT