हिंगोलीचे 'पिवळे सोने' भेटवस्तू रूपात देशपातळीवर झळकणार file photo
हिंगोली

Yellow Gold : हिंगोलीचे 'पिवळे सोने' भेटवस्तू रूपात देशपातळीवर झळकणार

लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना दिली जाणार हळदीच्या वस्तूंची भेट

पुढारी वृत्तसेवा

Hingoli's 'Yellow Gold' Set to Shine on the National Stage as a Gift Item

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा

हिंगोलीचे पिवळे सोने या नावाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकारातून हाती घेण्यात आलेल्या उपक्रमात महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची केंद्रासह राज्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना भेट दिली जाणार आहे. त्यातून या वस्तूंचे ब्रेडिंग करून या वस्तूंना वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे प्रयत्न प्रशासनाने चालविले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळदीचे उत्पादन घेतले जाते. राज्यातील एकूण उत्पादनाच्या सुमारे ४० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन हिंगोली जिल्ह्यात होते. या हळदीवर प्रक्रिया करून विविध वस्तू तयार केल्या जातात. विशेष म्हणजे, महिला बचत गटांनीदेखील हळदीपासून विविध खाद्यपदार्थांसह साबण, तेल व इतर वस्तू तयार केल्या आहेत.

या वस्तूंची देशपातळीवर ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या पुढाकारातून महिला बचत गटांनी हळदीपासून तयार केलल्या उत्पादनांचे आकर्षक गिफ्ट बॉक्स तयार केले आहेत. ते केंद्र व राज्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व मान्यवरांना भेट दिले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT