हिंगोली

हिंगोली : उगवलेल्या पिकांना वरुणराजाची प्रतिक्षा

मोहन कारंडे

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामातील पेरणी शेतकरी बांधवांकडून करण्यात आली, पण दोन दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उरलेली पेरणी बंद केली आहे. उगवलेल्या पिकांना वरुणराजाची प्रतिक्षा असून शेतकऱ्यांचे डोळेही आभाळाकडे लागले आहेत. लवकर पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर उदभवणार आहे.

येथील शेतकऱ्यांनी पावसाच्या आगमनामुळे खरीप हंगामातील पेरणी मृग नक्षत्रात आटोपली. पण मागील २-४ दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. मृग नक्षत्र संपल्यानंतर उद्या २१ जुन रोजी पावसाचे दुसरे नक्षत्र आद्रा सुरू होत आहे. जोरदार पाऊस पडल्याने हळद, कापूस, आणि सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. सध्या सोयाबीन दोन दोन पानावर उगवलेले आहे. आता पावसाने हुलकावणी दिल्याने उगवलेली पीके सुकू लागली आहेत. बागायतदार क्षेत्रात अनेक ठिकाणी शेतकरी सिंचनाने पाणी देत आहेत. कोरडवाहू क्षेत्रात मात्र लवकर पाऊस लागला नाही तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT