गंगा कदम pudhari photo
हिंगोली

Hingoli Shivjayanti Mahotsav : सहा जणांना शिवछत्रपती गौरव पुरस्कार जाहीर

अंध क्रिकेटपटू भारतीय संघाची उपकर्णधार गंगा कदमचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दिले जाणारे श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार बुधवारी जाहिर करण्यात आले. या पुरस्कारासाठी सहा जणांची निवड करण्यात आली असून यामध्ये अंघ महिलांच्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची उपकर्णधार गंगा कदम यांचा समावेश आहे.

येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध सहा क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार दिले जातात. यावर्षीही या पुरस्काराच्या निवडीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार समितीकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

यावेळी पुरस्कार समिती प्रमुख समन्वयक शिवाजीराव ढोकर पाटील, जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा सुनीताताई मुळे, प्रा. विक्रम जावळे, प्रा. राजेश भालेराव, प्रा. विशाल शिंदे, डॉ. शीतल कल्याणकर, प्रा अंजली टापरे, नागेश सराफ, अॅड. उल्हास पाटील, पंडीत अवचार, हरिभाऊ मुटकुळे यांची उपस्थिती होती.

यावेळी पुरस्कारासाठी सहा जणांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी या समितीच्या वतीने पुरस्कारार्थांच्या नावाची घोषणाही करण्यात आली आहे. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी रामदास जाधव (खानापूर), साहित्य क्षेत्र बबन शिंदे (कळमनुरी), सामाजिक क्षेत्र प्रकाशचंद सोनी (हिंगोली), क्रिडा क्षेत्र गंगा कदम (फुटाणा), शिक्षण क्षेत्र देविदास कदम (कळमनुरी), उद्योग क्षेत्र मीनाक्षी राजगुरू (हिंगोली) यांचा समावेश आहे.

  • गुरुवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. पुरस्कार प्राप्त मंडळींचे समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT