अमोल गंगलवाड Pudhari
हिंगोली

PSI Death Hingoli | हिंगोलीत रेल्वेसमोर उडी घेत 'पीएसआय'ने खाकी वर्दीत जीवन संपविले

हिंगोली जिल्हा पोलिस दलात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Hingoli Railway Incident

हिंगोली : शहरात एका पोलिस उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शनिवारी (दि.२९) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाखाली ही दुर्दैवी घटना घडली.

विशेष म्हणजे, घटनेवेळी संबंधित अधिकारी पोलिस गणवेशातच होते. या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. अमोल गंगलवाड (वय 50) असे मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाकडे आले होते. यावेळी पूर्णाकडून अकोलाकडे जाणारी रेल्वे खटकाळी पुलाजवळ आली असता, गंगलवाड यांनी अचानक रेल्वेसमोर उडी घेतली.

या भीषण धडकेत त्यांचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले. या घटनेची माहिती रेल्वेच्या लोकोपायलटने तात्काळ स्टेशन मास्तर यांना दिली. त्यानंतर स्टेशन मास्तरांनी हिंगोली पोलिसांना या घटनेबाबत कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपककुमार मस्के, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पाहणी केली असता, गंगलवाड यांचा मृतदेह पोलीस गणवेशातच आढळून आला. मृत गंगलवाड हे दोन महिन्यांपूर्वीच परभणी येथून बदली होऊन हिंगोली जिल्हा पोलिस दलात रुजू झाले होते. सध्या ते पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत होते. या घटने मागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT