Hingoli News : मिळालेल्या कर्जातून गावात दुधक्रांती करावी file photo
हिंगोली

Hingoli News : मिळालेल्या कर्जातून गावात दुधक्रांती करावी

जिल्हाधिकारी गुप्ता, पांगरा शिंदे येथे शेतकऱ्यांना कर्ज वाटप मेळावा

पुढारी वृत्तसेवा

Hingoli News: Milk revolution should be carried out in the village using the loan received

वसमत, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पांगरा शिंदे गावात दुग्ध उत्पादन वाढीसाठी भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँकेकडून कर्ज वाटप मेळावा १३ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला. दरम्यान, मिळालेल्या कर्जातून गावात दूद्ध क्रांती अपेक्षित आहे असे विचार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले.

तालुक्यातील पांगरा शिंदे येथे रोकडेश्वर मंगल कार्यालयात हा दुग्ध व्यवसाय कर्ज वाटप मेळावा पार पडला या. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, प्रमुख उपस्थिती म्हणून दिनेश कुमार झा, दीपक बारहाते, किरण चांदेरकर, वसमत गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक सुनील झोडगे, जिल्हा परिषदेचे पशु संवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण राठोड, नाबार्डचे अविनाश लहाने, सरपंच पूनम शिंदे, दत्तगुरु फार्म प्रोडूसर चे सूर्याजी शिंदे, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त गंगाधर शृंगारे आदींची उपस्थिती होती.

आयोजित बँक कर्ज वाटप मेळाव्यामध्ये विविध चार बँकेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांना ७५ दुधाळ म्हशीसाठी जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपये धनादेश द्वारे कर्जाचे वितरण करण्यात आले.

एवढेच नव्हे तर याच मेळाव्यात विविध उद्योगांना चार कोटी रुपयांचे कर्ज वाटप देखील करण्यात आले. मेळाव्यात बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, विविध बँकेकडून मिळालेल्या कर्जातून पांगरा शिंदे गावात नक्कीच दूद्ध क्रांती अपेक्षित आहे. शेतकरी बांधवांना शेती व्यवसायाशी सुरू असलेल्या जोडधंद्यातून हा दुधाचा व्यवसाय करता येणार आहे. यातून दुग्ध व्यवसायकांचा विकास देखील होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

तसेच बँकेचे अधिकाऱ्यांनी पांगरा शिंदे गावातील शेतकऱ्यांना माहिती देऊन दुग्ध व्यवसायाकडे अधिकाधिक शेतकऱ्यांनी वळावे असे आवाहन देखील केले. यावेळी बँक ऑफ इंडिया वसमत शाखेचे शालिकराम जाधव, चोंडी येथील ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक दैठणकर, भारतीय स्टेट बँक तसेच युनियन बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

रमेश चेंडके यांचे दर्पण दूध उत्पादक प्रोडूसर कंपनि च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास पांगरा शिंदे येथील व परिसरातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास शिंदे यांनी केले तर आभार रमेश चेंडके यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर वानखेडे, साईनाथ शिंदे सोपान मारकळ, सोनबा शिंदे यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT