संतोष बांगर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल File Photo
हिंगोली

MLA Santosh Bangar : हात-पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पहा...

नाहीतर पीकविमा कंपनीच्या ऑफिसचा चुरा करू, आमदार संतोष बांगर यांचा अधिकाऱ्याला इशारा

पुढारी वृत्तसेवा

MLA Santosh Bangar Crop insurance company Shiv Sena Shinde group

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा हात-पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पहा, नाहीतर पीकविमा कंपनीचे जिथे जिथे ऑफिस आहेत ते चुरा करू, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पीकविमा अधिकाऱ्याला दिला आहे. संतोष बांगर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संतोष बांगर यांनी पीकविमा अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी संतोष बांगर यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार त्यांनी पीकविमा अधिकाऱ्याला फोन करत तातडीने मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.

आमदार संतोष बांगर यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनुसार ते म्हणाले, पीकविम्याचा जो विषय आहे, पीक कापनीचे जे आदेश दिले आहेत, त्यात डोंगर भागातले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा धिंगाणाच होऊन जाईल. पीकविम्याचा गोडवा तुमच्याकडे ठेवू नका. शेतकरी त्रस्त आहेत, शेतकरी कोणत्या संकटात आला आहे ते पहा, नदीकाठच्या शेतकऱ्यांचे तर सरसकटच गेले आहे, माती सगळी वाहून गेली आहे. जे चांगल्या शेतातले जे पीक आहेत, त्यात वरच्या शेंगा दिसत आहेत, खालचे तर सगळे पाण्यातच गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करा.

पुढे बोलताना संतोष बांगर म्हणाले, मराठवाड्यात भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की तुमचं सर्व्हे झाला पाहिजे. कंपनीचे हित बघू नका, शेतकऱ्यांचे हित बघा. त्यात काही कमी जास्त झाले तर संतोष बांगर एवढा वाईट माणूस आहे, हिंगोलीत तुमचा एकही माणूस राहू देणार नाही. तुमचे जिथे जिथे ऑफिस आहेत तिथे चुरा करू. तुम्हाला हातपाय सहीसलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पहा. कळमनुरी भागात सगळा नदीचा भाग आहे. तिथे शेतकऱ्यांचा नायनाटच झाला आहे. डोंगर असेल, नदीकाठ असेल सगळीकडे सत्यानाश झाला आहे.

गोरगरीब लोकांना किट आल्या आहेत दिवाळीसाठी. ९९ टक्के खराब झाले आहे. शेती शेतकऱ्याच्या हिताचे करा, असा सज्जड दमच संतोष बांगर यांनी पीकविमा अधिकाऱ्याला भरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT