Hingoli Crime pudhari photo
हिंगोली

Hingoli Crime : अवैध सावकारीच्या संशयावरून कळमनुरीत एका घरावर छापा

तीन बाॅण्डसह एक शपथपत्र सापडले, जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : कळमनुरी शहरातील शास्त्रीनगर भागात सहकार विभागाच्‍या पथकाने मंगळवारी सकाळी एका घरावर छापा टाकून तपासणी केली. यामध्ये तीन बाँण्ड सह एक शपथपत्र सापडले असून सदर कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत. जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कळमनुरी शहरातील शास्त्रीनगर भागातील किरण वंटनकर हे सावकारी करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक फुपाटे यांनी सहकार विभागाचे स्वतंत्र पथक स्थापन केले. त्यानुसार सहकार अधिकारी बी. एम. बिरकुर, यु. व्ही. चोंढीकर, व्ही. वाय. ठाकरे, डी. एस. पतंगे, जी. एस. काहुरे, जमादार के. जी गुंजकर, एस. बी. डोल्हारे यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी वंटनकर यांच्या घरी जाऊन तपासणी केली.

यावेळी तपासणीमध्ये तीन बॉण्ड सापडले असून त्यात एका बाँण्डवर तीस हजार रुपये, दुसऱ्या बाँण्डवर वीस हजार रुपये, तीसऱ्या बाँण्डवर वीस हजार रुपये घेतल्याचे नमुद असून तीनही बाँण्डवर घेणारा व देणाऱ्याचा करार सहा महिन्याचा असल्याचे नमुद आहे. याशिवाय एक शपथपत्र सापडले असून त्यावर ६.१० लाख रुपये घेतल्याचे नमुद असून सदर रक्कम तीन वर्षात परतफेड करण्याचे नमुद केले आहे.

  • सहकार विभागाच्या पथकाने पंचनामा करून सदर कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेतली आहेत. या बॉण्ड वरील व शपथपत्रावरील नमूद व्यक्तीला चौकशीसाठी बोलावले जाणार असून या चौकशीनंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT