Illegal sand transport pudhari photo
हिंगोली

Hingoli Illegal Sand Transportation : टिप्परसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चालक चौकशीसाठी ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : शहरात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे टिप्पर पोलिसांच्या पथकाने पकडले असून १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टिप्पर चालकाविरुद्ध शनिवारी पहाटे हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्ह्या‌त वाळू घाटांवरून अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी महसूल व पोलिस विभागाची पथके तैनात करण्यात आली आहे. या शिवाय प्रत्येक पोलिस ठाण्यांचे गस्तीपथक देखील अवैध वाळू वाहतुकीवर लक्ष ठेऊन आहेत. दिवसा व रात्रीच्या वेळी पथकाकडून वाळू घाटावरील मार्गावर तपासणी केली जात आहे. यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली जात आहेत.

दरम्यान, पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांनी गस्तीसाठी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून हिंगोली शहरात शुक्रवारी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास गस्त घातली जात असतांना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गावर एका टिप्परमधून वाळू वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तातडीने वाहन थांबवून चालक शेख रिजवान (रा. माळहिवरा) याची चौकशी सुरु केली.

यावेळी पोलिसांनी वाळू वाहतुकीचा परवाना व इतर कागदपत्रांची मागणी केली असता त्याला कागदपत्रे सादर करता आली नाही. यामुळे पोलिसांनी टिप्पर व वाळू असा १० लाखांचा मुद्देमाल जप्त करून पोलिस ठाण्यात आणला आहे.

या प्रकरणी जमादार अर्जुन यादव यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शेख रिजवान याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, जी. आर. पोटे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT