हिंगोली

हिंगोली: अवैध वाळू तस्करांचा तलाठ्याला टॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

अविनाश सुतार

कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा : अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर रोखत असताना ट्रॅक्टरचालक व त्याच्या सहकाऱ्याने तलाठी याला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याला ट्रॅक्टरच्या टायरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी रात्री ११.३० च्या दरम्यान चिंचोर्डी येथे घडली.

याबाबत माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील क्याधू नदीवरून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याने तहसील प्रशासनाने गस्त सुरू केली आहे. तलाठी जगदीश दिनकर कुलकर्णी व कोतवाल कोंढुर हे चिंचोर्डी या रस्त्यावर कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. ज्ञानेश्वर पतंगे या ट्रॅक्टर चालकाने आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी तलाठी कुलकर्णी यास लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर तलाठी आणि कोतवाल या कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टर च्या टायरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कसाबसा आपला जीव वाचविला.

या प्रकरणी तलाठी कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर पतंगे, ट्रॅक्टर चालक व इतर दोघांविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कळमनुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक गजानन कांगणे पुढील तपास करीत आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT