Goregaon Jintur Highway Farmers Protest
हिंगोली: काही शेतकऱ्यांची पूर्ण शेतीच पाण्याखाली गेली असल्याने शेतकऱ्यांनी उदरनिर्वाह करायचा कसा? या त्रागापोटी हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी गोरेगाव - जिंतूर महामार्ग रोखत स्वतःचे सरण रचून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
राज्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीच्या पावसाने हाहाकार माजला असताना इकडे हिंगोली जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी मदत द्या, पूर्ण पणे पीकविमा द्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, या मागणीसाठी जिवंत पणे सरण रचून रस्ता रोको करत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. कनेरगाव नाका ते येलदरी जिंतूर महामार्गांवर हाताळा पाटीजवळ महिला आणि पुरुष यांनी सुद्धा सहभाग नोंदविला होता.