Hingoli Fire Accident pudhari photo
हिंगोली

Hingoli Fire Accident : आगीत भाजलेल्या ‘त्‍या’ कर्मचाऱ्याचाही मृत्यू

मृतांची संख्या तीनवर, १० जखमींवर उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : शहरातील कपडागल्ली भागातील फटाका गोदामातील आग प्रकरणात हिंगोली पालिकेच्या अग्नीशमन दलातील कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान बुधवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेत मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर इतर १० जखमींवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरातील कपडागल्ली भागातील गोपाल बासटवार याच्या घरातील गोदामात फटाके साठवून ठेवण्यात आले होते. या गोदामाला सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागली होती. या आगीमध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर इतर ११ जण भाजल्या गेले.

या जखमींना लातूर, छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये पालिकेच्या अग्नीशमन दलातील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांच्यावर हिंगोली येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातुर येथे हलविण्यात आले होते.

दरम्यान, लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना पालिकेचे अग्नीशमन दलाचे कर्मचारी दिलीप दोडके (५०) यांचा बुधवारी पहाटे मृ्‌‍त्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर इतर १० जणांवर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले . त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून २४ तास लक्ष ठेवले जात असल्याचे प्रशासनाच्‍या वतीने सांगण्यात आले.

  • हिंगोली पालिकेच्या अग्नीशमन दलातील अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक कर्मचारी म्हणून दिलीप दोडके यांची ओळख होती. त्यांच्या मृत्यूने पालिका प्रशासनावर शोककळा पसरली आहे. मयत दिलीप यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. मयत दिलीप यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT