Hingoli Crime News : घरांची रेकी करून दोन दुचाकी पळवल्या file photo
हिंगोली

Hingoli Crime News : घरांची रेकी करून दोन दुचाकी पळवल्या

तिरुपती नगर परिसरात चोरट्यांचा हैदोस, चोरटे सीसीटीव्हीत कैद

पुढारी वृत्तसेवा

Hingoli Crime News: Two two-wheelers stolen after conducting recce of houses

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा शहरातील तिरुपती नगर भागात चोरट्यांनी दोन दुचाकी वाहने पळविल्याची घटना शुक्रवारी घडली. यावेळी चोरट्यांनी परिसरातील घरांची रेकी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे.

शहरातील तिरुपती नगर भागामध्ये शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पाच चोरट्यांनी प्रवेश केला. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी पायाचा आवाज येऊ नये यासाठी पायातील चपला व बुट काढून हातात घेतली होती. या चोरट्यांनी परिसरातील बहुतांश घराची रेकी केली. चोरट्यांनी काही घरांच्या संरक्षण भिंतीवरून उड्या मारून आत प्रवेश केला. मात्र कुठेही चोरी करण्यात चोरट्यांना संधी मिळाली नाही.

यावेळी चोरट्यांनी तिरुपती नगरातील रहिवासी असलेले विजय लोथे यांच्या घराजवळ उभ्या केलेल्या दोन दुचाकी पळविल्या. शुक्रवारी सकाळी लोथे यांनी पाहणी केली असता घरासमोरील दोन्ही दुचाकी पळविल्याचे दिसून आले. हिंगोली शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, गणेश लेकुळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी चोरटे तिरुपती नगर परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधल्यामुळे त्यांचे चेहरे स्पष्टपणे ओळखू येत नसल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली असून त्यावरून आता चोरट्यांची ओळख पटविण्याची प्रयत्न सुरू केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT