crime news  file photo
हिंगोली

Hingoli killed|चोंडी फाटा प्रकरण : पेट्रोल पंप मालकासह ५ जणांवर गुन्हा, धारदार शस्त्राने भोकसून हत्या

Hingoli Chondi Phata case |चोंडी फाटा प्रकरण : पेट्रोल पंप मालकासह ५ जणांवर गुन्हा, धारदार शस्त्राने भोकसून हत्या

पुढारी वृत्तसेवा

वसमत - चोंडी फाटा येथील साई उमेश पेट्रोल पंपावर झालेल्या खून प्रकरणात कुरुंदा पोलिसांनी पेट्रोल पंप मालक उमेश पांडववीर याच्यासह ५ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गु.र.नं. ३७०/२०२६ अन्वये भा.न्या.सं. चे कलम १०३(१), १८९(२), १९१(२)(३), १९० सह आर्म्स अॅक्ट ४/२५ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

इंडियन ऑईलचे सिनियर मॅनेजर गुलृलाकुंटला मणीप्रसाद (वय ३९, रा. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला. मयत महेश अण्णाराव शेळके (वय ३७, रा. लेगाव ता. अहमदपूर, ह. मु. नांदेड) हे एका ऑईल कंपनीत नोकरीला होते.

दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता चोंडी येथील पेट्रोल पंपावर "दुसऱ्याला पंप चालवायला कसा देतो" या वादावरून आरोपींनी बेकायदा जमाव जमवून शिवीगाळ व दगडफेक केली. त्यानंतर मुख्य आरोपी उमेश पांडववीर याने खंजिराने महेश शेळके यांच्या छातीत, पाठीत, डोक्यात, गळ्यावर सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे.

या गुन्ह्यात उमेश पांडववीर त्याची पत्नी, एक अनोळखी महिला आणि दोन तरुणांचा समावेश आहे. घटनेचा तपास पोउपनी गधकवाड करीत असून आरोपी फरार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT