Bus Theft Case  (File Photo)
हिंगोली

Hingoli Bus Theft | बसमध्ये चोरट्यांचा हातसाफ; महिलेचे ७० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

वारंगा फाटा ते उमरखेड मार्गावरील बसमध्ये गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने केले लंपास

पुढारी वृत्तसेवा

Hingoli Waranga Phata to Umarkhed bus theft

आखाडा बाळापूर : वारंगा फाटा ते उमरखेड मार्गावरील बसमध्ये गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा विठ्ठल माखणे (वय ५६, रा. शेवाळा, ता. कळमनुरी) या १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता वारंगा फाटा येथून उमरखेडकडे जाणाऱ्या बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये मोठी गर्दी असल्याने त्यांनी आपली बॅग सीटवर ठेवण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीकडे दिली.

काही वेळाने त्यांनी बॅग तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. चोरट्याने मंगळसूत्रातील सुमारे ७ ग्रॅम सोन्याचे मणी (किंमत अंदाजे ३५ हजार रुपये) तसेच कानातील दोन सोन्याचे झुंबर (किंमत अंदाजे ३५ हजार रुपये) असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT