Driver trapped in bus rescued
औंढा नागनाथ : येथील नागनाथ मंदिराच्या परिसरात पालखीच्या ठिकाणी खाजगी बस खाली अडकलेल्या बलून पाण्यासाठी गेलेल्या चालकाचे बलून फुटल्याने हाउसिंग जवळ डोके अडकून बसले. तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली. रविवार (दि. 11) रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेत हा प्रकार घडला. केवळ नशिब बलवत्तर म्हणून तो सुखरूप बचावल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
याबाबत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वर्धा येथील एका कंपनीची बस भावीकांना घेऊन देव दर्शनासाठी निघाली होती. माहूर येथे दर्शन घेऊन आज सकाळी चार वाजता बस औंढा नागनाथ येथे पोहोचली. काही वेळानंतर बसच्या खालच्या बाजूला असलेल्या बलून मधून हवा लिक होत असल्याचे चालक सुनील देवतळे याच्या लक्षात आल्याने त्याने खाली बघण्यासाठी प्रयत्न केले. मात्र यावेळी अचानक बलुन फुटल्याने बसचा पाठीमागचा भाग खाली आला. यावेळी हौसिंग व शॉप च्या मध्ये सुनील याचे डोके अडकून पडले. त्यानंतर त्याने डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही.
त्यामुळे त्याने आरडाओरडा केली. यावेळी दुसऱ्या बस चालकाने बघितले. यावेळी सुनीलचे डोके त्याला अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक जीएस राहीरे, जमादार वसीम पठाण, ज्ञानेश्वर गोरे, अमोल चव्हाण, संतोष धनवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी माधव गोरे, सतीश चोंडेकर, लल्ला देव, विजय राठी, उमेश जाधव, सय्यद रियाज, सय्यद मैनोद दिन, जितेंद्र नेवल यांच्या मदतीने ज्याक आनून बस वर घेतली. त्यानंतर त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. तब्बल दोन तासाच्या नंतर शॉप्ट व इतर भाग सुट्टे करून चालक सुनील याची सुखरूप सुटका केली. दोन तासाच्या या थरारानंतर सुनीलची सुखरूप सुटका झाल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. यावेळी दैव बलवत्तर होते म्हणूनच तो वाचला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.