Barashiv Utkarsh Sapatkar Kho-kho Selection Pudhari
हिंगोली

Hingoli News | बाराशिवच्या उत्कर्ष सापतकरची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

Barashiv Utkarsh Sapatkar | हिंगोली जिल्हा किशोर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने वसमत येथे 12 डिसेंबर रोजी खो-खो दिनानिमित्त निवड चाचणीचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

Barashiv Utkarsh Sapatkar Kho-kho Selection

जवळा बाजार: हिंगोली जिल्हा किशोर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने वसमत येथे 12 डिसेंबर रोजी खो-खो दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन च्यावतीने निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये निवासी हायस्कूल बाराशिव या शाळेचा उत्कर्ष सापतकर या खेळाडूने आपले उत्कृष्ट खेळी दाखवून मुंबई येथील वडाळा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला क्रीडा शिक्षक ऋषिकेश हलगे यांनी मार्गदर्शन केले.

खेळाडूचे व मार्गदर्शक शिक्षकाचे संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग माऊली कदम, उपाध्यक्ष यादवराव कदम, मुनीर पटेल,सचिव विक्रम शिंदे, सहसचिव प्रा .गजानन मुळे, संदीप कदम, ज्येष्ठ संचालक मुरलीधरराव मुळे, प्रा.बी.डी. कदम, विश्वनाथराव कदम, आबासाहेब कदम, सुदामराव दशरथे ,नारायणराव पावडे, धोंडीरामजी अंभोरे,विश्वनाथ यादवराव कदम,पंढरीनाथ कदम,अजमल पटेल, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता कातोरे,पर्यवेक्षक लक्ष्मीकांत कोपले,अशोक दाडगे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT