ज्ञानेश्वर विश्वनाथ कदम Pudhari
हिंगोली

Aundha Nagnath PSI Death | औंढा नागनाथ येथे पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

ज्ञानेश्वर कदम मागील तीन दिवसांपासून घरी परतले नव्हते

पुढारी वृत्तसेवा

Aundha Nagnath Police Sub Inspector Body Found

औंढा नागनाथ : येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर विश्वनाथ कदम (वय ५५) यांचा मृतदेह सकाळी नागनाथ मंदिर परिसरातील भक्त निवास क्रमांक १ शेजारील एका खोलीत आढळून आला. परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पाहणी केली असता कदम यांचा मृतदेह आढळला.

माहितीनुसार, ज्ञानेश्वर कदम हे मागील तीन दिवसांपासून घरी परतले नव्हते. तसेच त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे कुटुंबीयांशी संपर्क होत नव्हता. घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम हे काही काळापासून कॅन्सर आजाराने त्रस्त होते. ते मूळचे रांजाळा येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे पोलिस दलासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT