The body found  File Photo
हिंगोली

Aundha Nagnath Youth Dead | औंढा नागनाथ बसस्थानकात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील मृत तरुण

पुढारी वृत्तसेवा

Aundha Nagnath Bus Stand Youth Dead Body Found

औंढा नागनाथ : तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील २६ वर्षीय युवकाचा मृतदेह औंढा नागनाथ येथील बसस्थानकात गुरुवारी (दि. २७) सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली. गोविंद राधोजी पिंपरकर असे मृत युवकाचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, दारूच्या नशेत मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गोविंद पिंपरकर यांना दारूचे व्यसन असल्याची माहिती आहे. ते बुधवारी औंढा नागनाथ येथे आले होते. रात्रीच्या सुमारास ते बसस्थानकात थांबले होते. गुरुवारी सकाळी बसस्थानकात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार बबन चव्हाण, शाहेद सय्यद, जयदीप जाधव आणि ओंकारेश्वर रांजणेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, गोविंद पिंपरकर यांचे लग्न झालेले नव्हते. त्यांच्या वडिलांचेही यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.

या प्रकरणी औंढा नागनाथ बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक नंदकिशोर किशन गिरी यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास जमादार बबन चव्हाण करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT