Hingoli News : फटाका गोदाम अवैधच : जिल्हाधिकारी file photo
हिंगोली

Hingoli News : फटाका गोदाम अवैधच : जिल्हाधिकारी

शहरातील कपडागल्ली भागातील फटाका साठवणुकीचे गोदाम अवैध होते.

पुढारी वृत्तसेवा

Firecracker godown illegal: Collector

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा शहरातील कपडागल्ली भागातील फटाका साठवणुकीचे गोदाम अवैध होते. आता या भागात आणखी काही घरांमध्ये फटाका साठवणूक केली आहे का? याची शहानिशा करण्यासाठी डोअर टू डोअर तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

कपडा गल्ली भागात सोमवारी झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेतील गंभीर जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. गंभीररित्या भाजल्या गेलेल्या रुग्णांवर नांदेड, लातुर, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार केले जात असून त्यांच्या प्रकृतीकडे प्रशासनाचे लक्ष आहे.

हिंगोली शहरातच नव्हे तर जिल्हयात कुठेही यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाकडूनच आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. फटाका विक्रीचे परवाने देतांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे काय याची शाहनिशा करूनच फटाका विक्रीचे परवाने दिले जाणार आहेत.

आगीत भाजलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाखाची मदत : नगराध्यक्षा रेखा बांगर हिंगोलीतील कपडागल्ली भागातील अरुंद रस्त्यांवर जीवाची बाजी लावून आग विझवताना पालिकेचे तीन अग्निशामक कर्मचारी गंभीर भाजले. या आगीत अग्निशमन वाहनही जळाले. नगराध्यक्षा रेखा बांगर यांनी जखमी रवी कांबळे, अक्षय सांगळे व दिलीप दोडके यांच्या उपचारासाठी प्रत्येकी १ लाख रुपयांची तातडीची मदत घोषित केली आहे.

१,३९० किलो फटाके जप्त

हिंगोलीतील मारवाडी गल्ली येथील फटाका दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी फटाका साठवणुकीची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेत आतापर्यंत १,३९० किलो बेकायदेशीर फटाके जप्त करत चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT