पऱ्हाट्यावर पेटवून घेत शेतकऱ्याने जीवन संपविले File Photo
हिंगोली

पऱ्हाट्यावर पेटवून घेत शेतकऱ्याने जीवन संपविले

कर्जाची परतफेड, शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कृत्य, साळवा येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Farmer ends life by setting himself on fire

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्ह्यातील साळवा (ता. कळमनुरी) येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने पऱ्हाट्याचे दत्तराव माखणे (वाळलेल्या कापसाच्या काड्या व कचरा) सरण रचून स्वतःला पेटवून घेतले. या दुर्घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बँकेच्या कर्जाच्या तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. मृत शेतकऱ्याचे नाव दत्तराव डिगंबर माखणे (वय ४८) असे असून ते साळवा गावचे रहिवासी होते. शेतकऱ्याच्या मागे आई-वडील, पत्नी, विवाहित कन्या, एक मुलगा असा परिवार आहे. माखणे यांच्या नावावर साळवा शिवारात सुमारे अडीच एकर शेती होती आणि त्या

खरीप, रब्बी पिके हातची गेल्यामुळे होते नैराशावस्थेत शेतातच पहाट्याचा ढीग गोळा करून पेटविला मृतदेह आढळला जळालेल्या स्थितीत, मोबाईल घटनास्थळी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. शेतीच्या कामासाठी त्यांनी कळमनुरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियातून कर्जही घेतले होते. मात्र गेल्या काही काळापासून शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या होत्या.

मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने त्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर रब्बी हंगामातही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे कर्जफेड कशी करायची याची चिंता माखणे यांना सतावत होती. या आर्थिक तणावामुळे ते काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी कात्री ते शेतात जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते परतले नाहीत. त्यांचा मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न कुटुंबीयांनी केला, परंतु लोही झाला नाही.

त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. रात्री उशिरा त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता तिथे धक्कादायक दृश्य दिसून आले. पहाटीच्या फासाजवळ जळालेल्या अवस्थेत दत्तराव माखणे यांचा मृतदेह आढळून आला, घटनास्थळी त्यांचा मोबाईल फोन, पाण्याची बाटली आणि चप्पलाही नडलेल्या अवस्थेत दिसून आल्या.

त्यामुळे त्यांनी पहाटीच्या फासावर बसून स्वतः ना पेटवून घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळ तसेच जमादार पोले यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी नामदेव माखणे यांनी कळमनुरं पोलिस ठाण्यात दिलेल्या अर्जात कर्जामुळे हे कृत्य केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT