गोकर्णेश्वर माळरानावर अवतरली पंढरी file photo
हिंगोली

Gokarneswar Mahadev : गोकर्णेश्वर माळरानावर अवतरली पंढरी

येथील गोकर्णेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्याने साक्षात पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईचे दर्शन होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

पुढारी वृत्तसेवा

Crowd of devotees in the Gokarneshwar plateau area on Saturday for Ashadhi Ekadashi

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : येथील उंच डोंगरावर प्रति पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोकर्णेश्वर माळरान परिसरात शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त हिंगोली, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यातील हजारो भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

येथील गोकर्णेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्याने साक्षात पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईचे दर्शन होते अशी भाविकांची ख्याती असल्याने सकाळपासून भाविकांनी डोंगर घाटाचा रस्ता चढून गोकर्णेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. निसर्गाच्या कुशीत मंदिर असल्याने भाविकांनी फराळाचे साहित्य आणून वनभोजनाचा आनंद घेतला.

वन विभागाचा वन पर्यटन परिसर असल्याने वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, वन परिमंडळ अधिकारी स्वाती कीर्तनकार, वनपाल सुदर्शन पोले यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT