Woman Assault Pudhari
हिंगोली

Hingoli crime : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली ः हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात महिलेस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केला अन महिला गरोदर राहिल्यानंतर गर्भपात न केल्यामुळे संबंध तोडणाऱ्या एका विवाहित तरुणाविरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील महिलेचा पती मागील 12 वर्षापासून बेपत्ता झाला आहे. त्या महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत विवाहित तरुण वैजनाथ शिंदे याने तिच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. यामध्ये सदर महिला गर्भवती राहिल्यानंतर तिने सदर प्रकार वैजनाथ याला सांगितला.

दोन महिन्याची गर्भवती राहिल्यामुळे आता माझ्याशी लग्न कर असे म्हणत तिने वैजनाथ याच्याकडे लग्नाची मागणी केली. दरम्यान, सदर महिला गर्भवती राहिल्याचे समजताच वैजनाथने त्या महिलेसोबत बोलणे टाळत होता. तु गर्भपात केला तरच तुझ्याशी लग्न करतो अन्यथा मी तुझ्याशी बोलणार नाही असे त्याने महिलेस सांगितले. मात्र महिलेने गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे वैजनाथ याने तिला बोलणे बंद करून लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

यावरून पोलिसांनी वैजनाथ शिंदे याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी आता त्या विवाहित तरुणाच्या शोधासाठी एक पथक स्थापन केले असल्याचे पोलीसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT