फटाके फोडल्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू  file photo
हिंगोली

फटाके फोडल्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

घरासमोर फटाके का फोडले, या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका ३० वर्षीय तरुणाला झाडाला दोरीने बांधून काठीने निघृण मारहाण करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

A young man was beaten to death in a dispute over setting off firecrackers

वसमत/कुरुंदा, पुढारी वृत्तसेवा :

घरासमोर फटाके का फोडले, या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका ३० वर्षीय तरुणाला झाडाला दोरीने बांधून काठीने निघृण मारहाण करण्यात आली. या जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला असून, ही धक्कादायक घटना वसमत तालुक्यातील डोणवाडा येथे शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी कुरुंदा पोलिसांनी बाप-लेकावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

कैलास स्वामी (वय ३०, रा. कुरुंदा) असे मृत तरुणाचे नाव आहे. कैलास शुक्रवारी रात्री आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून डोणवाडा येथे गेला होता. तेथे त्याने बालाजी तमेवार याच्या घरासमोर फटाके फोडले.

कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी कैलासला बेशुद्ध अवस्थेत कुरुंदा येथील रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदारे आणि त्यांच्या पथकाने रात्रीच डोणवाडा गाठून आरोपी बालाजी तमेवार व होनाजी तमेवार यांना बेड्या ठोकल्या. विलास स्वामी यांच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT